लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि. २९ : गडचिरोली येथील मूल मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ असलेल्या गटारात एका अनोळखी इसमाच्या मृतदेह गटारात आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेमागे घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह बघण्यासाठी घटनास्थळावर बघ्यांची प्रचंड गर्दी जमलेली आहे.
मागील तीन दिवसापासून जिल्हा परिषदेचा एक कर्मचारी बेपत्ता असल्याची तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेली होती. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.