कालेश्वरम त्रिवेणी संगम स्थित गोदावरी नदीत बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

सिरोंचा, 16 जुन – तेंलगाणा राज्यातील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील कालेश्वरम त्रिवेणी संगम गोदावरी नदीत दुर्घटना होऊन एक युवक बेपत्ता झाल्याची घटना दी,१६ जून रविवार रोजी घडली होती .मात्र युवकाचा शोध गवसला नाही शेवटी आज पुन्हा पोलीस आणि मच्छीमाराच्या मदतीने शोध घेतले असता आज सकाळीच मच्छीमारांना मृतक युवकाचे शरीर सापडले असून अखिल गरिकापाती (१९) रा. वारंगल असे बुद्ध बेपत्ता मृतक युवकाचे नांव आहे.

तेलंगाणा राज्यातील वारंगल शहरातील अखिल गरिकापाती हा त्याची आई रजनी, बहीण रक्षिता आणि नातेवाईकांसह कालेश्वरम मधील श्री कालेश्वर मुक्तीश्वर स्वामी दर्शनाला आले. दरम्यान मंदिरात जाण्यासाठी आधी गोदावरी नदीत पवित्र स्नान करून पूजाअर्चा करण्याचा आलेल्या भाविकांचा मानस असतो.

त्यामुळेच नदीत पवित्र स्नान करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या खोल पात्रात गेला . त्यानंतर तो बाहेरच आले नसल्याचे सोबत असलेल्या परिवाराने स्थानिक मच्छिमारांना माहिती देण्यात आली. शोधा शोध करण्यात आले मात्र स्थान पत्ता लागलाच नाही .शेवटी तेलगणातील पोलिसांना घटनेची माहिती देताच कालेश्वर येथील पोलिस निरीक्षक भवानी सेन यांना आपल्या कर्मचाऱ्यांसह गोदावरी नदीच्या काठावर पोहोचून पाहणी केली. एवढेच नव्हे तर पोलीस विभागाच्या बोटीच्या साहाय्याने शोध घेतला. मात्र बेपत्ता झालेल्या मुलाचा रात्र होऊ नही शोध लागला नाही. शेवटी रात्री झाल्याने सकाळ होण्याची वाट पाहून शोध मोहीम राबवले असता आज सकाळच्या सुमारास मृतकाचे शरीर आढळून आले आहे.

परिवारातील लोकांनी एकच हंबर्डा फोडल्याने सर्वांचे डोळे पानावले. लगेच पोलीस विभागांनी घटनेचा पंचनामा करून शुभविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून शवविच्छेदन होताच परिवाराला सुपूर्त करण्यात येईल.

kalehwarriver dead body foundsironchaswming
Comments (0)
Add Comment