निवडणूक आयोगासमोर शिवसेना दोन्ही गट येणार आमने-सामने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 29 नोव्हेंबर :-  राष्ट्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांना समोरासमोर युक्तिवाद करण्यासाठी दिनांक १२ डिसेंबर रोजी बोलविले आहे. निवडणूक आयोगाने मूळ शिवसेनेचे धन्युष बाण चिन्ह गोठविल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली .त्याची सुनावणी प्रलंबित आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपली कागदपत्रे सादर करण्यास सांगितली होती. परंतु आज निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना दिनांक १२ डिसेंबर रोजी समोरासमोर युक्तिवाद करण्यास सांगितले आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र्रराज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी होणार होती. पण सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यीय खंडपिठातील एक न्यायमूर्ती गैरहजर राहिल्याने आजची सुनावणी तहकूब करण्यात आल्याचे समजते. १६ आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत राज्यातील सत्ता संघर्षावर तोडगा निघू शकत नाही, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.

हे पण वाचा :-