ब्रेकिंग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या विदर्भात, वाचा कुठे करणार आहे कालव्याची पाहणी….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ०७ जानेवारी: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या विदर्भाच्या दौऱ्यावर येनार असून कोरोना संकटाच्या काळात प्रथमच दौऱ्यावर येत असल्याने प्रचंड गोपनीयता या दौऱ्याबद्दल प्रशासनाने बाळगली आहे

उद्या सकाळी 11 वाजता ते भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वाई येथे येणार त्यानंतर तेथील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ते दुपारी 2 वाजता नागभीड तालुक्यातील किरमटी मेंढा येथिल सुरू असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची पाहणी करणार आहेत.

गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामात होणारी अनियमितता,होणारा भ्रष्टाचार,पाण्यापासून शेतकरी वंचित या सारख्या अनेक तक्रारी सात्यत्याने होत असल्याने मुख्यमंत्री या प्रकल्पाच्या कामात गती यावी यासाठी हा पाहणी दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्री महोदयांचे शुक्रवार, दिनांक 08 जानेवारी,2021 चा कार्यक्रम

(नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्हा दौरा)
वर्षा निवासस्थान
सकाळी
08.10 वा. वर्षा निवासस्थान येथून मोटारीने सांताक्रूझकडे प्रयाण
08.55 वा. छ.शि.म.आं.विमानतळ, सांताक्रूझ येथे आगमन
09.00 वा. विमानाने नागपूरकडे प्रयाण
10.15 वा. नागपूर विमानतळ येथे आगमन
10.20 वा. हेलिकॉप्टरने गोसीखुर्द, ता. पवनी, जि. भंडाराकडे प्रयाण
10.40 वा. गोसीखुर्द हेलिपॅड, ता.पवनी, जि.भंडारा येथे आगमन
10.45 वा. मोटारीने गोसीखुर्द धरणाकडे प्रयाण
10.55 वा. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प येथे आगमन

11.40 वा. मोटारीने राजीव टेकडी, ता. पवणी, जि. भंडाराकडे प्रयाण
11.45 वा. राजीव टेकडी, ता. पवणी, जि. भंडारा येथे आगमन

01.00 वा. मोटारीने गोसीखुर्द धरण हेलिपॅडकडे प्रयाण
01.10 वा. गोसीखुर्द हेलिपॅड येथे आगमन
01.15 वा. हेलिकॉप्टरने मौजा खेडमक्ता, ता.ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूरकडे प्रयाण
01.30 वा. शासकीय तंत्रनिकेतन, बुम्हपुरी समोरील वनविभागाचे खुले पटांगण हेलिपॅड, ता.ब्रम्हपुरी येथे आगमन

01.35 वा. मोटारीने घोडाझरी शाखा कालव्यावरील नॅशनल हायवे क्रॉसिंगकडे प्रयाण
01.50 वा. घोडाझरी शाखा कालव्यावरील नॅशनल हायवे क्रॉसिंग येथे आगमन

02.20 वा. मोटारीने शासकीय तंत्रनिकेतन, बुम्हपुरी समोरील वनविभागाचे खुले पटांगण हेलिपॅड , जि. चंद्रपूर हेलिपॅडकडे प्रयाण

02.35 वा. शासकीय तंत्रनिकेतन, बुम्हपुरी समोरील वनविभागाचे खुले पटांगण हेलिपॅड, येथे आगमन
02.40 वा. हेलिकॉप्टरने नागपूर विमानतळाकडे प्रयाण
03.10 वा. नागपूर विमानतळ येथे आगमन
03.15 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण

04.30 वा छ.शि.म.आं. विमानतळ, सांताक्रूझ येथे आगमन
04.35 वा. मोटारीने प्रयाण

मुख्यमंत्र्यांचा दौऱ्यासाठी चंद्रपूर व भंडारा जिल्हा पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन सज्ज झालेले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे