ब्रेकिंग न्यूज: कोरड्या विहिरीत बिबट्या, वन विभागाचे पथक बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी रवाना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. १९ एप्रिल: जालन्यातील अंभोडा कदम गावात एका कोरड्या विहीरीत बिबट्या आढळून आला आहे. काल रात्रीच्या सुमारास हा बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. हा बिबट्या पाण्याच्या शोधात असताना अंधारात विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आज सकाळच्या सुमारास अंभोडा कदम गावातील गावकऱ्यांना संजय चव्हाण यांच्या शेतातील कोरड्या असलेल्या विहिरीत बिबट्या असल्याचं दिसताच त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली.   माहिती प्राप्त होताच वन विभागाचे पथक बिबट्याला विहिरी बाहेर काढण्यासाठी घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.

leopards