गडचिरोली जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जिल्हा पूरनियंत्रण कक्ष, गडचिरोली : 

1. वैनगंगा नदी : गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट बंद असुन पॉवर हाऊस मधून 160 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे. वैनगंगा नदीची पाणी पातळी पवनी, वडसा, वाघोली व आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.

2. वर्धा नदी : निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 3 गेट 5 से.मी. सुरु असुन विसर्ग 14.40 क्युमेक्स आहे. वर्धा नदीची पाणी पातळी बामणी (बल्हारशा) व सिरपूर सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असून इशारा पातळीच्या खाली आहे.

3. प्राणहिता नदी : प्राणहिता नदीची पाणी पातळी महागांव व टेकरा सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.

4. गोदावरी नदी : मेडीगड्डा बॅरेज चे 85 पैकी 85 गेट बंद असुन गेटव्दारे विसर्ग निरंक आहे. गोदावरी नदीची पाणीपातळी कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.

5. इंद्रावती नदी : इंद्रावती नदीची पाणी पातळी जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे. पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.

हे देखील वाचा :

खा. अशोक नेते यांच्या हस्ते नगर परिषदेच्या परिसरात वृक्षारोपण

सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून त्यांचे प्रश्न तात्काळ निकाली काढावेत – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

प्रत्येकाने आपल्या निवासी तसेच कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करावे – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे