पाणी काय आकाशातून आणू काय !

गुलाबरावांची जीभ घसरली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 20 ऑक्टोबर :-  ऑक्टोबर महिना आला तरी पाऊस थांबायचे काही नाव घेत नाही.पुण्यात तर अजूनही पूर परिस्थिती आहे. पाण्याचे अनेक स्तोत्र अति पावसामुळे बंद झाले आहेत. त्यामुळे बऱ्याच गावात आजही पाण्याचा दुष्काळ पडला आहे. अशातच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणी काय आकाशातून आणू काय ? असे म्हणत नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे .

पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. असे असताना शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी विधान केले आहे की, “पाणी नाही तर मग आता आकाशातून पाणी आणू का” असं वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना बोलताना केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून तर त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

सध्या पावसाच्या पाण्यामुळे अनेक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर नद्यांमध्ये विहीरी असल्यामुळे त्यांच्यामध्येही पाणी गेले आहे. पंपही बुडाले आहे. पाणबुड्याही सध्या पाण्याच्या पातळीमुळे काम करत नाहीत. त्यामुळे पाण्याची टंचाई आहेच पण आता काय आकाशातून पाणी टाकतील काय? असं गुलाबराव पाटील बोलताना म्हणाले. तर पाण्याची व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

हे पण वाचा :-

gulabraopatil