लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी, 29 ऑगस्ट :आलापल्ली निवासी पदवीधर शिक्षक विजय दुर्गे यांनी जलरंगात कोरोनाचा विषय व हाताच्या मुद्रेवर बुद्धाचा संदेश देणारी दोन्ही चित्र काढून त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावरील मनीकर्णीका आर्ट गॅलरी झाशी येथे झाली . कला संस्थेच्या संचालिका कामिनी बागेल यांच्या निरीक्षणातून वरील चित्रांना राष्ट्रीय स्तरावरील कांस्यपदकाचा मान मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.
मनस्वी कलावंत असलेले विजय दुर्गे यांना लहानपणापासूनच कलेची आवड असल्याने त्यांनी आपल्या कालेचा वापर शालेय विद्यार्थ्यांसाठी केला. चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य दुर्गम भागात विकसित करण्यात नेहमी मदत करतात. शालेय स्तरावर अनेक कलात्मक नवोपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण केली. यातूनच शासकीय एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेला आवडीने विद्यार्थी बसतात.
महाराष्ट्र राज्यातून दुर्गे यांच्या चित्राची राष्ट्रीय स्तरावर निवड होऊन पदक व प्रशस्तीपत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.सदर कलेसोबत दुर्गेना निबंध व कला लेखनाची आवड आहे. काही मासिकात पण सदर लेख प्रसिद्ध झालेले आहेत.शिकूया चित्रकला या नवोपक्रमाला बक्षीस सुद्धा मिळाले आहे.
कलेतून शिक्षण, अंकातून शिक्षण, कार्यानुभवातून शिक्षण हे नवोपक्रम लेखन त्यांनी केले आहेत.कलेचा प्रसार व प्रचार होण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या दुर्गेची चित्रे पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, नांदेड, न्यू दिल्ली येथील प्रदर्शनात प्रसिद्ध झाले आहेत. यातून त्यांनी कोरोना ग्राम स्वच्छता पर्यावरण व शैक्षणिक विषयावर जनजागृती केली आहे. अशा प्रगतीशील विजयी चे सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत होत आहे.
हे पण वाचा :-