लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घराला नोटीस बजावण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात नागपूरच्या महाल भागात दोन गटात मोठा राडा झाला होता. या हिंसक संघर्षात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. नागपूर महापालिका Action मोडवर आली आहे.
नागपूर :- नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात नागपूरच्या महाल भागात दोन गटात मोठा राडा झाला होता. या हिंसक संघर्षात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. वाहनं फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. हिंसक झालेल्या जमावाने दगडफेक केली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणारे पोलीस आणि आग विझवण्यासाठी पोहोचलेले अग्निशमन दलाचे जवान यामध्ये जखमी झाले. एका महिला पोलिसाचा विनयभंग झाला. या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन हा सर्व वाद झाला. काही अफवा पसरवण्यात आल्या. या सगळ्या हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले होते की, जे या प्रकरणात दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल केली जाईल. फहीम खानच्या घरावर अनिधकृत बांधकाम असेल, तर त्यावर हातोडा चालवला जाईल. नागपूर महापालिका Action मोडवर आली आहे. नोटीस बजावल्यानंतर त्यांनी संपूर्ण घर खाली केलं आहे.