अज्ञाताने आग लावल्याने धानाचे पुंजणे जळून खाक .

कुनघाडकर परिवारावर आर्थिक संकट, तीन लाखांचे नुकसान. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चामोर्शी, दि. ९ डिसेंबर:- चामोर्शी शहरातील हनुमान नगर प्रभाग १४ मध्ये राहणारे बाबुराव कुनघाडकर यांच्या लालडोंगरी जवळ असलेल्या धानाच्या शेतात (दोन पुंजने) दोंन गंजीला अज्ञाताने आग लावल्याने लाखोचे नुकसान  झाल्याने कुनघाडकर परिवारावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. 

गेल्या आठ वर्षांपासून नामदेव उंदिरवाडे याची  सहा एकर शेती कराराने घेऊन शेतात जयप्रकाश, जयश्रीराम धानाची लागवड केली होते. सात दिवसापूर्वीच धान कापणी करून चुरणे करण्यासाठी मशीनचा शोधात असतांंनाच ७ डिसेंबर रोजी सांंयकाळी बाबुराव कुनघाडकर पती पत्नी ६ वाजेपर्यंत शेतात पाहणी करून घरी आल्यानंतर रात्रौ ७ ते ८  च्या  दरम्यान अज्ञातानी धानाच्या सात ऐकर मधील दोन गंजिला आग लावल्याने  धानाची गंजी जळत असल्याची माहिती त्या मार्गाने जाणाऱ्या ढाली च्या मुलाने पुंजणे जळत असल्याची माहिती रात्रो 9:30 दिली. माहीती मिळताच कुनघाडकर परीवाराने शेताकडे धाव घेतली.

त्यावेळी पुंजणे जळत होते दरम्यान नगरपंचायत मुख्याधिकारी यांना माहिती देताच काही वेळात पाण्याची टँकर  व  नगरपंचायतचे कर्मचारी आले परंतु शेतात टँकर जाण्यास रस्ता अवघड असल्याने शर्तीचे प्रयत्न  करण्यात आले. मात्र गंजी जवळ टॅंकर जाऊ शकले नाही. त्यामुळे काहीच उपाय नसल्याने धानाची गंजी अखेर जळून खाक झाल्याने त्यात अंदाजे ३ लाखाचे नुकसान झाले. दरम्यान पोलीस विभागालाही माहिती देण्यात आली असता पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच  दि. ८ डिसेंबर रोजी चामोर्शी चे तलाठी नरेंद्र मेश्राम, कालीदास मांडवगडे यांनीही पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी कुनघाडकर परिवाराकडून करण्यात आली आहे.