नागपूरात बस आणि ऑटो मध्ये भीषण अपघात.

भारतीय लष्कराचे 2 जवान मृत्यू तर 7 जवान जखमी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नागपुर, 17 जुन – कन्हान मार्गावर काल रात्री बस आणि तीन चाकी ऑटो मध्ये झालेल्या भीषण अपघातात झाला त्यात भारतीय लष्कराचे 2 जवानांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून 6 जवानांसह ऑटोचालक असे एकूण 7 जण गंभीर जखमी आहेत. या घटनेत ऑटो चा पूर्णपणे चुराडा झाला आहे. सदर घटना कामठी पोलीस ठाण्याचा हद्दीत घडली आहे. या झालेल्या दुर्घटनेत विघ्नेश आणि धीरज रॉय या जवानांचा मृत्यू झाला आहे, तर गंभीर जखमी असलेल्या 6 जवानांसह ऑटो चालकाला विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सदर अपघातातील सैनिक हे प्रशिक्षणासाठी नागपूरातील कामठी येथील सैनिकी प्रशिक्षण केंद्रात आले होते. दरम्यान काल रविवार असल्याने गार्ड रेजिमेंट ट्रेनिग सेंटर मधील 15 जवान खरेदी करण्यासाठी कन्हान शहरात गेले होते. दरम्यान खरेदी करून एका ऑटोत 8 तर दुसऱ्या ऑटो मध्ये 7 सैनिक परत आपल्या कामठी प्रशिक्षण केंद्रात येत असताना कन्हान नदीचा पुलावर नागपुर वरून शिवणीला सुसाट वेगाने जाणाऱ्या बस ने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटोला जोरदार धडक दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. नेमकी घटना कशी घडली, या मध्ये दोष कुणाचा आहे हे तपासून बघितले जाणार आहे.. जखमींवर नागपुरातील ट्रॉमा सेंटर, मेयो रुग्णालय तसेच काही जणांना कामठी येथीलच आशा हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू आहे.

khannan accidentनागपूर
Comments (0)
Add Comment