अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर 17 नोव्हेंबर :-  सन 2022-23 या वर्षाकरीता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकार अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दांपत्याकरीता तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व ज्या नामांकीत स्वयंसेवी संस्था सार्वजनिक विश्वसत मंडळ नियम 1950 खाली नोंदणीकृत झालेल्या आहेत. अशा संस्था मार्फत कन्यादान योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनेचा लाभ घेणाऱ्या दांपत्याने खालील नमुद केलेल्या कागदपत्रांसह या कार्यालयास दि. 22.11.2022 ते 08.12.2022 या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज सादर करायत संबंधीत लाभार्थ्यांना आदिवासी विकास विभाग शासन शुध्दिपत्रक क्र. सावियों – 2003 / प्र.क्र.1558 मंत्रालय विस्तार मुंबई 32 दिनांक 18 फेब्रुवारी 2002 अन्वये रु.10,000/- डी.बी. टी. द्वारे लाभ प्रति जोडप्यांना देण्यात येईल तसेच लग्न सोहळयासाठी सेवाभावी संस्था तयार आसल्यास त्यांनी ही अर्ज करण्याचे आवाहन आयुषी सिंह, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, यांनी केले आहे.

योजनेच्या अटी व शर्ती 

वर वधुचा प्रथम विवाह असणे आवश्यक आहे व त्यांना अपत्य असता कामा नये, नवदाम्पत्यापैकी एकजण वर किंवा वधू अनुसूचित जमातीचा असणे आवश्यक आहे, विवाहाच्या दिनांकास वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वर्ष असणे बाहनकारक आहे, सक्षम प्राधिकृत अधिका-याने दिलेले वर व वधूचा अथवा दोन्हीपैकी एक जातीचा दाखला, बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही कालमाचा भंग या दाम्पत्य / कूटूंब यांचेकडून झालेला नसावा याबाबतचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (Affidavit सादर करणे आवश्यक आहे. (रुपये- 20/- च्या स्टॅम्प पेपरवर), जन्म तारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत, महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याचा पुरावा (Domicile Certificate) सदर योजनेचा लाभ मिळणेकरिता लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावे. विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, जि.पालघर या कार्यालयातील कन्यादान योजनेच्या कक्षाकडून उपलब्ध करुन दिले जातील.

हे पण वाचा :-