चामोर्शी तालुक्यातील नरेंद्रपुर येथील विक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू मागील 15 दिवसात लाखोंचा मुद्देमाल नष्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली :  चामोर्शी तालुक्यातील नरेंद्रपुर येथील विक्रेत्यांविरोधात सातत्याने मोहीम सुरू आहे. मागील 15 दिवसात शोधमोहीम राबवून जवळपास 3 लाख 45 हजारांचा मुद्देमाल नष्ट करीत दरुविक्रेत्यांवर गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आला आहे. अशातच पुन्हा एकदा घोट पोलिसांनी जंगलपरिसरात मोह फुलाचा सडवा व साहित्य नष्ट करीत एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नरेंद्रपुर येथे अवैध दारूविक्री केली जाते. या गावात सात विक्रेते सक्रिय असून इतर गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जात होता. गावात दारूबंदी लागू करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेकडून विविध उपक्रम राबविले जात आहे.
मागील पंधरा दिवसात दारू विक्रेत्यांचा मुद्देमाल नष्ट करीत  काही विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीसुद्धा एका विक्रेत्यानी जंगल्परिसरत हातभट्टी लावली असल्याची माहिती प्राप्त झाली.  त्या आधारे घोट पोलीस, तंटामुक्त समिती,  गाव संघटन, ग्रामपंचायत समिती व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या शोधमोहीम राबवली असता, 3 हातभट्टया आढळून आल्या. सोबतच घटनास्थळावर 32 बोरे व 5 ड्रम मोहफुलाच्या सडव्यासह 3 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका दारू विक्रेत्यावर घोट पोलीस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई घोट पोलीस मदत केंद्राचे एपीआय गोहणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष महेश विश्वास,  सदस्य किशोर कुंडू, ग्रामपंचायत सदस्य सरोज तरफदार, संतोष राऊत,  युवा सदस्य किशोर कुंडू, लक्ष्मीकांत मंडल, बिरेन तरफदार, कमल विश्वास, विश्वजित विश्वास, मुक्तीपथ चे तालुका संघटक  आनंद इंगळे, विनोद पांडे उपस्थित होते.
Comments (0)
Add Comment