सेवानिवृत्त शिक्षकांची शिक्षक पदी निवड रद्द करून डीएड,बिएड बेरोजगार युवकांना नियुक्त करा..

सामाजिक कार्यकर्ते सचिन येरोजवार यांची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातुन मागणी....

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 29 जुले – पेसा क्षेत्रातील शिक्षक पदे रिक्त असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना निवड करण्याचे संबंधित जिल्हा परिषदांना शालेय शिक्षण विभागाने पत्रान्वये आदेशीत केले आहे.तीस चाळीस हजार रुपये पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृतांना दिलेली संधी रद्द करून शंभर टक्के रिक्त पदावर पात्र बेरोजगार युवकांना नियुक्ती करावे असे सामाजिक कार्यकर्ते सचिन येरोजवार यांनी अहेरीच्या अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री  शिंदे यांच्याकडे निवेदनातुन मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचे पत्र दिनांक 15/07/2024 रोजी संबंधित जिल्हा प्रशासनांना पत्राद्वारे आदेशीत केलेल्या पत्रकांमध्ये जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शाळेमध्ये रिक्त असलेल्या शिक्षक पदी सेवानिवृत्त शिक्षकांना निवड करण्याचे प्रथम प्राधान्य दिले असून राज्यामध्ये आमच्या सारखे लाखों डीएड, बीएड प्रशिक्षित बेरोजगारांचे फोज असताना तीस ते चाळीस हजार रुपये पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा शिक्षक म्हणून नियुक्ती करणे हे आम्हा बेरोजगांरावर अमानुष अन्याय केल्यासारखं आहे.यामधून आम्हा बेरोजगांरामध्ये वैफल्य निर्माण होत असून आम्ही जगावे कसे हा प्रश्न आमच्यासारख्या लाखों बेरोजगारांसमोर आहे असे निवेदनात म्हटले आहे.

सदर शासन परिपत्रकात सेवानिवृत्तानां दिलेली संधी रद्द करून शंभर टक्के पदावर पात्रबेरोजगार युवकांना नियुक्ती करुन त्यांना कसे-बसे जगण्याची संधी उपलब्ध करून दयावे असे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सामाजिक कार्यकर्ते सचिन येरोजवार यांनी निवेदनातून मागणी केली आहे.