विस निवडणुकीत उमेदवार दारूबंदीचा समर्थक असावा

-जिल्हाभरातील गावांमध्ये ठराव घेणे सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.

गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेने जाहीरनामा काढला आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा उमेदवार हा जिल्ह्यात मागील ३१ वर्षांपासून लागू असलेल्या दारूबंदीचा समर्थन करणारा असावा तसेच दारू पिणारा, पाजणारा, विकणारा असल्यास आम्ही मते देणार नाही, असे जाहीरनाम्यातून आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जागोजागी बॅनर व गावागावांमध्ये ठराव घेऊन जाणीव जागृती केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेली ३१ वर्षांपासून लागू असलेल्या दारूबंदीला जनतेचा पाठींबा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा उमेदवार हा जिल्ह्यातील दारूबंदी उठवणार नाही, उलट तिचे समर्थन करणारा आवश्यक आहे. त्यामुळे मते हवी असल्यास उमेदवार कसा असावा, याबद्दल जनतेने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जनतेला दारू पिणारा, दारू पाजणारा, दारू विकणारा, दारू कारखाना काढणारा तसेच दारूबंदी उठवा म्हणणारा उमेदवार नाही पाहिजे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी मते मागण्यापूर्वी जनतेला लिखित वचन द्यावे, की दारूबंदीचे समर्थन करीन. पूर्वीच्या निवडणुकीत (२०१९) असे वचन देऊनही वचनभंग केलेल्यांना आम्ही यावेळी मत देणार नाही. असा जाहीरनामा गडचिरोली जिल्ह्यातील गाव संघटना व जनतेच्या वतीने घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भातील बॅनर ग्रामीण व शहरी भागात विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. दारूमुक्ती संघटना, गाव व वार्ड संघटना, शक्तिपथ संघटना द्वारे याबाबत बैठक घेऊन ठराव घेण्यात येत आहे व जाणिव जागृती करण्यात येत आहे.

 

Comments (0)
Add Comment