लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातील धानोरा मार्गापासून पोटेगाव मार्गावर इतर व्यवसाय थाटून दारूविक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांकडून 3 हजार 200 रुपयांची देशी दारू जप्त करीत गुन्हा दाखल केल्याची कारवाई मुक्तीपथ व गडचिरोली पोलिसांनी संयुक्तरीत्या केली.
गडचिरोली शहरातील पोटेगाव रोड बायपास मार्गावर पानटेला, भंगारसह इतर व्यवसाय आहेत. परंतु काहीजण इतर व्यवसायांच्या आड देशी दारू विक्री करतात. सायंकाळी व सकाळी दारू पिणाऱ्या मध्यपींची गर्दी असते. दारू विक्री ठिकाणच्या बाजूला शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे या ठिकाणची दारू विक्री बंद करण्याचे आवाहन शहरातील नागरिक करीत आहेत.
यापूर्वी सुद्धा पोलिसांनी या मार्गावरील विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. अशातच वॉर्ड संघटनेच्या माहितीचे आधारे तीन ठिकाणी पोलीस व मुक्तिपथ टीमने धाड टाकून 90ml चे 45 निपा अंदाजे 3 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गडचिरोली पोलिस स्टेशन चे पिआय रेवचंद सिंगनजुडे यांचे मार्गदर्शनात धनंजय चौधरी, राजेंद्र पुरी, ऋषाली चव्हाण, डी.बी पथक व मुक्तीपथ टीमने केली.