20 रूग्णांवर झाली मोतीबिंदू शस्त्रक्रिया

लोक बिरादरी प्रकल्प दवाखाना हेमलकसा येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 18, ऑक्टोबर :-  भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प दवाखान्यात आज मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरात एकुण 20 रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली.

गडचिरोली येथील डॉ. अद्वय अप्पलवार हे गेल्या सात वर्षापासून लोक बिरादरी प्रकल्प दवाखाना हेमलकसा यांच्या सहयोगातुन मोफल मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतात. हेमलकसा दुर्गम क्षेत्र असून येथील आदिवासी बांधव गरीब असल्यामुळे आणि त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाउन अथवा दूसरी कडे जावून महागडे उपचार घेणे शक्य नसते. त्यामुळे ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, अशा गरीब आदिवासी बांधवांच्या सुविधेसाठी हेमलकसा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.

आज पर्यंत भामरागड येथील आदिवासी दुर्गम भागातील सरासरी 1000 रूग्णांनी अशा शिबिराचा लाभ घेतल्यामुळे त्यांना नवीन दृष्टी मिळाली आहे. डॉ. दिगंत आमटे व डॉ. अनघा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश बुरडकर व लोक बिरादरी प्रकल्प दवाखाना हेमलकसा येथील आरोग्य कर्मचार्यांच्या उपस्थितित हे शिबिर पार पडले. यावेळेस डॉ. दिगंत आमटे यांनी भामरागड तसेच आदिवासी भागातील गरजू रूग्णांनी आरोग्य शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा :-

मी संविधान मानणारा त्यामुळे चौकशीच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी – अजित पवार

अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मॅनहोल्सच्या स्वच्छतेसाठी रोबोट सज्ज

cataracthwmalkasasurgery