चिमुकल्या बालकांना कपडे आणि खाऊ वाटप करून साजरा झाला वाढदिवस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. २ मार्च: व्यापारी संघटना आलापल्ली चे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे यांचा वाढदिवस  दुर्गम भाग असलेल्या कुरुमपल्ली येथील अंगणवाडीच्या चिमुकल्यांसोबत साजरा करण्यात आला.

या निमित्ताने माँ. विश्वभारती संस्थे तर्फे अंगणवाडीच्या चिमुकल्या बालकांना खाऊ आणि नवीन कपडे वाटप करण्यात आले.

लहान असो की मोठा वाढदिवस म्हंटल तर साजरा करायला कोणाला आवडणार नाही. त्यासाठी मोठी तयारी केली जाते खायला गोडधोड, नवीन कपडे या सोबतच सेलिब्रेशन हे समीकरण ठरलेल असतंच.

मात्र, सामाजिक आपुलकी जपून आपला वाढदिवस दुर्गम भागातील अंगणवाडीच्या चिमुकल्या सॊबत साजरे करणारे फार थोडे व्यक्ती असतात.

या निमित्ताने नवीन कपडे व खाऊ मिळाल्याने लहानग्यांना अत्यानंद झाला .

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब गडदे यांची उपस्थिती होती. माँ.विश्वभारती सामाजिक संस्थेचे सुनीता पांडे, अमोल कोलपाकवार, गंगाधर रंगू, जहांगीर शेख, त्रिशूल डांगरे, दीपक नौनूरवार आदींची उपस्थिती होती.

Chandrakishor Pande