लोकसेवकांकडून कामंं करून घ्या, हीच दुसऱ्या स्वातंत्र्यांची लढाई आहे – विवेक पंडित.

पालघर येथे 38 वा वर्धापन दिन सोहळ्यात आदिवासी बांधवांना मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून देणार – विवेक पंडित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. 10 नोव्हेंबर: श्रमजीवी संघटनेचा 38 वा वर्धापन दिन सोहळा पालघरमधील मनोर जवळ मस्तान नाका येथे अतिशय उत्साहात साजरा झाला. यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक श्री विवेकभाऊ पंडित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच लॉकडाऊन काळात शाळा बंद असताना गाव-पाड्यात अभ्यासवर्ग घेणाऱ्या स्वयंसेवकांचा,तसेच जुन्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या जुन्या कार्यकरत्यानी संघटनेच्या वाटचालीतील आपले अनुभव आणि किस्से सांगितले. या कार्यक्रमाला विवेक भाऊनसोबत शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. वसंत चव्हाण, जि. प. सासस्या श्रीम. विनया विकास पाटील,  पंचायत समिती सभापती श्रीम. रंजनाताई म्हसकर,प. स. सदस्य श्री. आनंद पंडित यांच्यासह पत्रकार बंधू आणि मान्यवर उपस्थित होते.

श्रमजीवी संघटनेची स्थापना झाली तेव्हा केवळ 37 सदस्य होते, मात्र आज श्रमजीवीचे 1 लाख 40 हजारापेक्षा जास्त सदस्य असणारी राज्यातील सर्वात जास्त नोंदणीकृत सदस्य असलेली संघटना झाली आहे. अन्याय अत्याचारग्रस्त आदिवासींना ताठ मानेने जगण्यासाठी श्रमजीवी संघटनेने शिकवले. म्हणून संघटनेप्रति आणि संघटना वाढवण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी आपलं रक्त आटवले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक आदिवासी नृत्य आणि गाणी सादर केली.

ज्याप्रमाणे आपण गौरी गणपतीची पूजा अर्चा होते, त्याप्रमाणे श्रमजीवी संघटनेचे प्रतीक असलेली ही मूठ आहे, एकजुटीचे प्रतीक आहे त्या मुठीची पूजा केली जाते असे विवेक पंडित यांनी सांगितले. आज ही संघटना दीड लाखाच्या आसपास पोहोचली आहे. “आम्ही निवडणुकांमध्ये भाग घेतो पण, जे आम्हाला  सहकार्य करतात त्यांना आम्ही मदत करतो, मात्र जे आम्हाला विरोध करतात त्यांना आम्हीं पाडतो”  असे स्पष्ट मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले.

यावेळी मुंबईत पहिल्या मोर्चाची आठवण विवेक भाऊंनी सांगितली. “आम्ही हा पहिला मोर्चा केवळ 140 जणांनी केला, त्यावेळी आम्हाला अटक केल्यानंतर कवी वसंत बापट आणि प्रा. सदानंद वर्दे यांनी आमची मुख्यमंत्र्यांसोबत भेट करून दिली.  त्यावेळी मुख्यमंत्री वसंत दाद पाटील यांनी विचारले की तुमचे बळ काय आहे असे विचारले, त्यावेळी आम्हीं उत्तर देऊ शकलो नाही तेव्हा, वसंत दादांना प्रति प्रश्न विचारून आपण जेव्हा इंग्रज सरकारविरोधात पत्री सरकार स्थापन करून लढले, त्यावेळी तुमचे जे स्वातंत्र्यासाठी लढण्याचे बळ होते तेच बळ यांच्यात आहे असे सांगितले, आणि तेव्हा वसंत दादांनी संघटनेच्या मागण्या मान्य करून आम्हाला संरक्षण द्यायला संगीतले.  संघटना ही तेव्हापासून आजपर्यंत कुठलेही सरकार असो, आदिवासींच्या हक्कासाठी लढत आली आहे. आदिवासींना अळ्या पडलेल्या तांदूळ वाटप केला जात असताना संघटनेने तो थांबवला. हा तांदूळ आदिवासी विकास महामंडळाने भात खरेदी केलेल्या 5-6 वर्षांपूर्वीच्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी हा खटाटोप आहे आणि त्यातील सडका तांदूळ आदिवासींना वाटप केला जात आहे, असे मुखमंत्र्यांना पटवून दिले त्यावेळी तो  सडका तांदूळ वाटप तात्काळ थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच कल्याणमध्ये आजूबाजूला झगमगाट, उंच इमारती आणि बाजुला अंधारात चाचपडत असलेली कातकरी वाडी असे चित्र पहावयास मिळालं, अनेक आदिवासी वाड्या पाड्यांमध्ये स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्षी देखील मूलभूत सुविधा नाहीत याबाबत मुख्यमंत्र्यांना या दयनीय परिस्थितीबाबत मेसेज केला असता, त्यांनी आपण एक योजना तयार करा आणि ती आपण ती राबवू असा शब्द दिल्याचे विवेक भाऊ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रोजगार हमी योजनेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच,  प्रत्येकाला स्मार्ट कार्ड सारखे आधारकार्ड तयार करून द्या, ज्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला वेगळा जातीचा दाखला काढण्याची गरज लागणार नाही. जातीचे दाखले व आधार कार्ड यासाठी विशेष मोहीम राबिण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे विवेक भाऊंनी सांगितले. यावेळी बोलताना “सरकारने नेमलेल्या लोकसेवकांकडून कामं करून घ्या, हीच दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे” असे विवेक भाऊ पंडित यांनी उपसथितांना आवाहन केले. आणि 15  ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येक आदिवासींच्या घरात स्वातंत्र्याची किरणे पोहोचावी, किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ असा विश्वास विवेक पंडित यांनी व्यक्त केला.

यावेळी आजचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे पालघर तालुका अध्यक्ष दिनेश पवार, तालुका सचिव  सुरेश बरडे, सह सचिव वैशाली बारागा, नामदेव तांबडी, मनोज कवळी, वाळक्या मंडळ, अरविंद रावते, विजया सांबरे, सविता सांबरे, कान्हा पाराड, एकनाथ चव्हाण आणि इतर कार्यकर्यांनी मोलाचे योगदान दिले.

Vivek Pandit