छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. २० फेब्रुवारी: येथील पारबताबाई विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती, सामजिक अंतर व मास्क वापरून साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस एस कराडे होते तर प्रमुख अतिथि म्हणून शाळेतील शिक्षक हरिश्चंद्र भोवते, अशोक करंजेकर, सुरज हेमके, महेश चौधरी,तुळशीराम कराडे, क्रुष्नामाई खुणे, निर्मला मडावी, श्यामराव उंदीरवाडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एस कराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकून गनिमी कावा व त्यांच्यातील असणारी अभ्यासुव्रुत्ती बद्दल विद्यार्थ्यानां सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यानीं सुध्दा शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल महिती दिली.

सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक, हरिश्चंद्र भोवते सर यांनी केले. संचालन वर्ग 10 वीची विद्यार्थिनी आरती कराडे तर आभार नीलम सांडिल हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील कर्मचारी कैलास अंबादे, मुँशिलाल अंबादे, सुरेश जामकातन, आदींने सहकार्य केले.

Shivaji Jayanti Festival