लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
ठाणे : जिल्ह्यातील मुरबाड येथील सिद्धगड येथे ब्रिटिशांकडून वीर मरण आले. आज 80 वा स्मृतीदिन, यासाठी विनम्र अभिवादन करण्यासाठी, शहापूर नाभिक समाज व राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शहापूर निवासी कुणबी समाज मंडळ यांच्याकडून मशालज्योत प्रज्वलीत करून त्यांच्या आठवणी स्मरण करून त्याकाळच्या स्वतंत्र्य विरांना पराक्रमच्या उजळणी व इतिहास सर्वाना समाजावे या करिता आदरांजलीचा कार्यक्रम कै. विठ्ठलदादा खाडे चौक शहापूर येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश भांगरथ राष्ट्रीय ओबीसी महासंघ, तालुका अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ तथा अध्यक्ष शहापूर निवासी कुणबी समाज मंडळ अनिल निचीते , माजी उपनगरअध्यक्षनगर पंचायत शहापूर सुभाष विशे,तालुका अध्यक्ष नाभिक समाज पंडित सतकर, समाजसेवक मधुकर उबाळे, समाजसेवक रमेश वनारसे, मुबंई म्युनिसिपल बँक संचालक ह. भ. प. भानुदास भोईर महाराज, वाघ गुरुजी, मधुकर शिंदेभाऊसाहेब, श्री कुमार वेखंडे, सुभाष तोडकर, माजी तालुका अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा, भरत घनघाव, प्रशांत तोडकर, विशेष कार्यक्रम करिता उपस्थित होते. वीर भाई कोतवाल यांच्या जीवनावर प्रेरणादायी भाषणे करण्यात आली. यामध्ये मा. श्री प्रकाश भांगरथ सर, रमेश वनारसे सर, श्री अनिल निचिते, मधुकर उबाळेसाहेब, वाघ सर कुमार वेखंडे सर यांनी आठवणी जागवल्या.