राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके यांची १८८ वी जयंती आलापल्लीत उत्साहात साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. १२ मार्च: राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके यांची 188 वी जयंती आलापल्लीत आज संध्याकाळी राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव स्मृती समिती तर्फे मुख्य चौकात कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली.

यावेळी वीर बाबूराव चौकात शहीद स्मारकाला दिवे लावून आकर्षक रोषणाई करण्यात आली. स्मारक समितीचे अध्यक्ष भीमराव आत्राम यांनी शहीद स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रीय क्रांतीकारी शहीद योद्धा विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी इंग्रजाविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या संघर्षाचे योगदान समाजाला सदैव स्मरणात राहावे. इंग्रजांविरोधात स्वातंत्रलढ्यात वीर बाबुराव शेडमाके यांचे अमुल्य योगदान आहेत. असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.  

यावेळी स्मारक समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्य चौकातील शहीद स्मारक व वीर बाबुराव शेडमाके यांच्या नाव फलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी स्मारक समितीचे उपाध्यक्ष रावजी नैताम, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद आकंपल्लीवार, ग्राम पंचायत सदस्य पुष्पा अलोणे, माजी ग्राम पंचायत सदस्य कैलास कोरेत, राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव स्मृती समितीचे सदस्य आदित्य सिडाम, मुकुंद सडमेक, मीराबाई सडमेक, जमुना नैताम, वासुदेव आलाम आदींची उपस्थिती होती.

Veer Baburao Shedmake.