लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतीदिन बार्टीच्या वतीने साजरा

गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे समतादूत विभाग गडचिरोलीच्या वतीने झूम अँपच्या माध्यमातून लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.

जयकुमार मेश्राम

 

 

झूम अँपच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून जयकुमार मेश्राम होते. राजा कसा असावा हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना संबोधित केले.

जयकुमार मेश्राम आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना संबोधित करतांना म्हणतात “पूर्वी राणी च्या पोटी राजा जन्माला येत होता. परंतु आता लोकशाही असल्याने राजा हा लोकांमधून मतपेटीच्या माध्यमातून निवडला जातो. जनतेनी राजा निवडते वेळी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा राजा निवडावा” असे सांगितले.

ते म्हणाले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे शेतकऱ्यांची कैवारी सुद्धा होते. म्हणून त्यांनी राधानगरी हे धरण बांधले व शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाण्याची सोय करून दिली व शेतकऱ्यांना आत्मनिर्भर केले. शाहू महाराज हे  उपेक्षित व अस्पृश्य यांचे सुद्धा कैवारी होते. त्यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली व शिक्षण प्रसार केला. मुलांना शिक्षण घेत असताना त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी वस्ती गृहाची निर्मिती केली. शाहू महाराजांनी आपल्या राज्यात समता बंधुता आणि धर्म निरपेक्षपणे राज्य केले असेही त्यांनी यावेळी झूम अँपच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले.

कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून जिल्हा प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर उपस्थित होते. तसेच प्राध्यापक मनिष राऊत उपस्थित होते. तसेच भन्ते डॉ. धम्मसेवक, डॉ. बगमारे, डॉ. तेलंग व समतादूत तसेच नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व संचालन समतादूत वंदना धोंगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन होमराज कवडो यांनी केले.

हे देखील वाचा :

अहेरीतील अनाधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय सील

अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यांचा ५५ टन कांदा दिला पेटवून; ९ लाखांचे झाले नुकसान

स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे काम करून ‘ती’ करते कुटुंबाचा उदरनिर्वाह