उद्या केंद्रीय पथक पीक नुकसान पाहणीसाठी गडचिरोलीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. २३ डिसेंबर: ऑगस्ट महिन्यात व त्यानंतर झालेल्या पिकहानीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय पथक आज बुधवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहे. यामध्ये उद्या दि. २४ रोजी पहिले पथक नागपूर जिल्ह्याची तर दुसरे पथक गडचिरोली जिल्ह्याची  पाहणी करेल.

यामध्ये पहिले पथक सकाळी ९.१५  ते  १० वाजता या कालावधीत कामठी,  ११.३० ला पारशिवनी तर दुपारी १ वाजता मौदा तालुक्याची पाहणी करणार आहे.  पाहणी आटोपून दुपारी ४.३० वाजता हे पथक भंडारा जिल्ह्याकडे प्रस्थान करेल. हे पथक शुक्रवार दि. २५ ला चंद्रपूर, भंडारा व गोंदिया  जिल्ह्यातील काही गावांना भेट देईल. शनिवार दि. २६ सकाळी साडेदहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात येईल.

Kendriy Pathak