कमलापूर परिसरातील समस्यांकडे लक्ष वेधण्याकरीता रेपनपल्ली मार्गावर केले चक्काजाम आंदोलन

विविध समस्याकडे वेधले शासनाचे लक्ष.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : तालुक्यातील ग्रामसभा पॅनल कमलापुर व छल्लेवाडा स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण समितीच्या वतीने स्थानिक समस्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ४ जुलै रोजी सकाळपासून रेपनपल्ली मार्गावर चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

ग्रामसभा पॅनलच्या अध्यक्षा रजनीताई मडावी यांच्या नेतृत्वात तथा भारतीय जनसंसद गडचिरोली चे जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे यांच्या उपस्थितीत चक्काजाम करून वाहनांना रोखण्यात आले.

कमलापूर परिसरातील जवळपास १५ गावे स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत विकासापासून कोसोदूर असल्याने अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. अतिक्रमण धारकांचे तीन पिढीचा पुरावा रद्द करणे, छल्लेवाडा स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे, कमलापूर येथे मंजूर मंडळ अधिकारी कार्यालयाचे बांधकाम तथा ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्र निर्माण करणे, अहेरी-कमलापूर-सिरोंचा तथा दामरंचा बस सुरू करणे, लखामेंढा पर्यटन स्थळ घोषित करणे, कमलापूर येथे महाविद्यालय बँक सुरू करणे, नवीन तलावाचे खोलीकरण करणे, अहेरी-सिरोंचा मार्गाची चौकशी करून गुन्हा दाखल करणे, वनउपज गोळा करण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे आदी मागण्यांंकडे लक्ष वेधण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प पडली होती.

आंदोलनात भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार, संतोष ताटीकोंडावर, श्रीधर दुग्गिरालापाटी व रेपनपल्ली-कमलापूर येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हे देखील वाचा :

चिंचाळा येथील नालीचे निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून बांधकाम व्यवस्थित करण्याची उलगुलान संघटनेची मागणी

MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; … या नैराश्यातून विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल!

तब्बल ३५ लांखांचा गुटखा जप्त करण्यात पोलिसांनी मिळाले यश

 

 

 

Chakkajam Andolanlead storySantosh TatikondawarVijay Kharwade