विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ‘चला जाणू या नदीला’ या अभियानास व्यापक स्वरूप: जलपुरुष राजेंद्र सिंह

विद्यापीठ आपल्या गावात उपक्रमासह विद्यापीठाच्या अनेक उपक्रमाचे कौतुक
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 21 जून – गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होत आहे. परिणामी पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतो आहे. वाढते नागरीकरण, आणि औद्योगीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भू-पृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये, जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता व साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करणे आवश्यक आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ‘चला जाणू या नदीला’ या अभियानास व्यापक स्वरूप प्राप्त होईल तसेच विद्यापीठात सुरू असलेल्या अनेक उपक्रमाचे रमण मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेन्द्र सिंह यांनी कौतुक केले.

या प्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले , ‘चला जाणू या नदीला’हे अभियान विद्यापीठातील रासेयो विभागामार्फत राबविले जाते आहे. नद्यांच्या संवर्धनासाठी विद्यापीठ आपल्या गावात उपक्रमातून तसेच रासेयो विभागामार्फत हे अभियानाचा प्रसार केला जाईल.यासाठी विद्यापीठाचे प्राध्यापकाही काम करतील. नदी ही आपली माता आहे.तिचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच विद्यापीठातील ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यापीठ आपल्या गावात उपक्रम व विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र, या विभाग द्वारे सुरु असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा डॉ. नरेश मडावी यांनी सादर केला. तसेच आशिस घराई यांनी विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रा मार्फत सुरू असलेल्या उपक्रमाविषयी सांगितले. या प्रसंगी प्रा.डॉ. नंदकिशोर मने , प्रा वैभव मसराम, डॉ. प्रिया गेडाम,जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांचीही उपस्थिती होती.

गोंडवाना विद्यापीठात आज त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्रकाश आर. अर्जुनवार, डॉ सतीश गोगुलवार , मनोहर हेपट, केशव गुरनुले, डॉ सूमंत जी पांडे, रमाकांत कुलकर्णी , प्रवीण महाजन , सुनील राहणे उपस्थित होते.

हे पण वाचा :-