लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर : २३ डिसेंबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात वातावरणात बदल झालेला असून कमी दाबाचा पट्टा अवघ्या काही तासात इशान्ये – पूर्वकडे सरकल्याने दाब वाढलेला असून इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले असल्याने त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर झालेला असून, पुढील एक ते दोन दिवसांत राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत असून राज्यात डिसेंबर महिन्च्याच्या सुरवातीला कडाक्याची थंडी पडलेली होती. तसेच राज्यातील अनेक भागामध्ये किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसवर आलेला होता. त्यामुळे हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे राज्यात ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात येत होत्या. परंतु आता वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झालेली असून थंडीचा जोर काहीसा कमी झालेला आहे. हवामान विभागाने तर विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विदर्भातील किमान तापमानात वाढ झालेली असून, येत्या दोन दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात आर्द्रता वाढलेली असून काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील तूर, कांदा, गहू, हरबरा या पिकावर अळी, किडी, बुरशी, माव्याचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना किड व बुरशीनाशक औषधाच्या फवारण्या कराव्या लागण्याचीही शक्यता आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही गावात सोयी-सुविधांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष