चंद्रपूर : CTPS प्रकल्पग्रस्त मृतक कामगाराला योग्य मोबदला देण्यात यावा – राजू झोड़े

मृतक प्रकल्पग्रस्त कामगार प्रदिप धानोरकर याच्या परिवाराला थातूरमातूर मदत करून CTPS हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप उलगुलान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे राजु झोडे यांनी केला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्रात प्रकल्पग्रस्त प्रदिप धानोरकर हे काम करत असतांना त्यांचे अपघाती निधन झाले. ही बातमी कळताच उलगुलान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी तात्काळ मृतकाच्या परिवारास भेट दिली. सिटीपीएस च्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त प्रदिप धानोरकर यांच्या परिवाराकडून जबरदस्तीने थातूरमातूर मदत करून त्यांच्याकडून स्वाक्षर्‍या घेतल्याचा आरोप राजू झोडे यांनी केला आहे.

प्रकल्पग्रस्त कामगारांची जमीन CTPS मध्ये मोठ्या प्रमाणात गेलेली आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याऐवजी थातूरमातूर मदत करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न नेहमी CTPS कडून केल्या जाते. मृतक प्रदिप धानोरकर हे प्रकल्पग्रस्त कामगार होते व त्यांचा कामावरच अपघाती मृत्यू झाला. परंतु सिटी CTPS च्या विद्यमान अधिकाऱ्यांनी फक्त दोन लाख रुपये आणि परिवारातील एकाला कंत्राटी कामगार म्हणून नेमण्यात येईल असे आश्वासन दिले.

प्रकल्पग्रस्त कामगारांना  नियमित कामगार आहेत त्यांच्या प्रमाणे मोबदला देण्यात यावा व परिवारातील सदस्यांना नियमित नोकरी देण्यात यावी अशी मागणी उलगुलान कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे.

जर मृतक प्रदिप धानोरकर याच्या परिवाराला नियमित नोकरी व योग्य मोबदला मिळाला नाही तर उलगुलान कामगार संघटनेकडून संपूर्ण CTPS चे काम बंद पाडू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी CTPS  प्रशासनाला दिला आहे.

हे देखील वाचा :

दुकानाचे शटर तोडून लाखोंची चिल्लर उडवणाऱ्या टोळीला ठाणेनगर पोलिसांनी केले जेरबंद

धक्कादायक! अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू, प्र. कुलगुरू यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार

lead storyRaju Zode