- १५ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०१ पर्यंत पर्यटकांसाठी राहणार बंद.
- ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने जारी केलेल्या दिशा निर्देश पालन करण्यासाठी ताडोबा प्रशासनाचा निर्णय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. १४ एप्रिल: जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प १ ऑक्टोबर २०२० पासून कोविड-१९ चे काटेकोर पालन करून नैसर्गिक पर्यटन सुरू करण्यात आले होते. मात्र कोविड-१९ विषाणूचा संसार्गात वाढ होत असल्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन यांनी सुचविण्यात आलेल्या नियमानुसार राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प निसर्ग पर्यटन सावधगिरी बाळगून तसेच वन कर्मचारी, मार्गदर्शक आणि जिप्सी चालकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाची राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाचा संसार्गात झपाट्याने वाढ होत असल्याने अनेकांना जीवास मुकावे लागले आहे.
राज्यात कोरोना या महामारीने सर्वत्र थैमान घातले असल्याने महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे काल (१३ एप्रिल) झालेल्या बैठकीत जारी केलेल्या “ब्रेक द चेन” अभियानातील निर्देशांनुसार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर मधील इको टूरिझम उपक्रम वन्यजीव सफारी १५ एप्रिल २०२१ पासून बंद राहील.
वन्यजीव पर्यटकांनी १५ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत केलेल्या बुकिंगची संपूर्ण बुकिंग रक्कम रद्द करून www.mytadoba.org वर संबंधित बुकिंगच्या ई-वॉलेट मध्ये पर्यटकांची राशी जमा राहणार असून ई-वॉलेट मध्ये भविष्यातील ६ महिन्यासाठी वैध राहील असे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत माहिती देण्यात आली आहे.