चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात एक मृत्यू सह 102 नव्याने पॉझिटिव्ह.

74 जणांनी कोरोनावर मात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर डेस्क 15 डिसेंबर :- चंद्रपूर जिल्ह्यात मागील 102 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. 24 तासात 74 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 457 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 20 हजार 350 झाली आहे. सध्या 769 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 61 हजार 415 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 37 हजार 835 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

हे पहा वाचा :- कोरोनामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द.
आज मृत झालेल्यांमध्ये वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 338 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 311, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 102 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 39, चंद्रपूर तालुक्यातील सहा, बल्लारपुर एक, भद्रावती सहा, नागभीड एक, सिंदेवाही दोन, मुल चार, सावली चार, राजुरा 10, चिमुर चार, वरोरा 13, कोरपना सहा तसेच इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Chandrapur Covid Cases