जुहू, विलेपार्ले, सांताक्रुज व खार (पश्चिम), अंधेरी परिसरातील पाणीपुरवठ्यात बदल

झडप बदलवण्यासाठी १३ जुलै रोजी काही परिसरात पाणीपुरवठा बंद वा कमी दाबाने झडप बदलवल्यामुळे पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ९ जुलै : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, यासाठी देखील अव्याहतपणे कार्यरत असते. मुंबईकरांना करण्यात येणारा दैनंदिन पाणीपुरवठा हा सुरळीतपणे व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा विषयक परिरक्षणाची विविध कामे वेळोवेळी आवश्यकतेनुसार हाती घेतली जातात.

याच कामांचा भाग म्हणून पश्चिम उपनगरातील एच पश्चिम, के पूर्व व के पश्चिम या ३ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. या अनुषंगाने सुरळीत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने सदर अडचणींबाबत आवश्यक ती तांत्रिक उपाययोजना हाती घेण्यात येत असून, या अंतर्गत पाणीपुरवठ्याशी संबंधीत झडप (बटरफ्लाय व्हॉल्व) येत्या १३ जुलै २०२१ रोजी बदलविण्यात येणार आहे. यामुळे एच पश्चिम, के पूर्व व के पश्चिम या ३ विभागातील जुहू, विलेपार्ले, सांताक्रुज व खार (पश्चिम), अंधेरी (पूर्व व पश्चिम) इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा १३ जुलै २०२१ रोजी बंद राहणार आहे अगर कमी दाबाने होणार आहे. तरी संबंधीत परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी पाण्याचा साठा करुन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.

वरील बाबत सविस्तर तपशील असा की, बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे वेरावली जलाशय क्र ३ चे भाग क्र २ चे वांद्रे आऊटलेट वर असलेल्या १२०० मिलि मीटर व्यासाची झडप बदली करण्याचे करण्याचे काम मंगळवार दिनांक १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

सदर कालावधीत दिनांक १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागातील खालील नमूद परिसरात उपरोक्त नमूद कामाच्या कालावधीत काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्याचप्रमाणे के पश्चिम व के पूर्व विभागातील खालील नमूद परिसरात काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणारा परिसर व पाणी पुरवठा खंडित होणारा परिसर बाबतची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहेः

१. के पश्चिम विभागः-

गिलबर्ट हिल – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ८.३० ते ११.१५ वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

जुहू-कोळीवाडा (उर्वरित पुरवठा) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत असणा-या परिसरात सकाळी ८.०० ते ९.१५ वा. या कालावधी दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

चार बंगला – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.१५ ते २.१० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

विलेपार्ले (पश्चिम), जे. व्ही. पी. डी., नेहरु नगर – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.५५ वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील.

२. के पूर्व विभागः-

विलेपार्ले (पूर्व) (संपूर्ण विलेपार्ले पूर्व डोमेस्टिक एअरपोर्ट) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

सहार मार्ग, ना. सी. फडके मार्ग, ए. के. मार्ग, गुंदवली गावठाण, तेली गल्ली, साईवाडी, जिवा महाले मार्ग – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, जुना नागरदास मार्ग – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.०० ते १०.३० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

३. एच पश्चिम विभागः-

खोतवाडी, गझदरबंध, एस. व्ही. मार्ग (खार), लिंकींग रोड (खार), सांताक्रुझ (पश्चिम), खार (पश्चिम) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.३० ते ९.०० वाजेपर्यंत असणा-या परिसरात सकाळी ६.३० ते ९.०० या कालावधी दरम्यान पाणीपुरवठा होईल.

एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागातील सदर परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, सदर कामाच्या दरम्यान दिनांक १३ जुलै २०२१ रोजी रात्री १०.०० वाजेपासून सकाळी १०.०० वाजेपर्यंत काही ठिकाणी कमी दाबाने, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित राहणार आहे, याची नोंद घेण्यात यावी. तसेच या अनुषंगाने नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी पाण्याचा साठा करुन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.

 

हे देखील वाचा :

मोठी बातमी: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती

दक्षिण आर्मी कमांडर यांनी प्रादेशिक सेना गृप मुख्यालय आणि अग्नीबाझ विभागाला भेट देवून कार्य सज्जतेचा घेतला आढावा

 

 

lead storymumbai mnp