लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 1 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक 03 नोव्हेंबर 2023 अन्वये, छत्तीसगड राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (गोंदिया व गडचिरोली) कार्यरत आहेत, तथापि, त्यांची नावे छत्तीसगड राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मंगळवार, दि. 07 नोव्हेंबर 2023 रोजी आणि शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर 2023 या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच तेलंगणा राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्हांमध्ये (गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ व नांदेड) कार्यरत आहेत. तथापि, त्यांची नावे तेलंगणा राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी गुरूवार दि. 30 नोव्हेंबर 2023 या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे. ही सुटी केवळ मतदानाच्या दिवशी अनुज्ञेय राहील, असे अधिसुचनेव्दारे कळविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.