मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विविध विकास कामाची केली प्रत्यक्ष पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,दि.25 फेब्रुवारी : मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत चांदाळा,वाकडी,पुलखल इत्यादी ग्रामपंचायत ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवुन विकास कामाची पाहणी केली व मार्गदर्शनात्मक सुचना दिल्या.

वाकडी ग्रामपंचायत ला सांडपाणी घनकचरा व्यवस्थापण व सार्वजनिक शौचालय बांधकाम ची पाहणी केली. व त्यातील अंतर्गत घटकांबाबत चर्चा करुन गावात कुटुंब संख्ये नुसार घनकचरा व्यवस्थापण करणे गरजेचे आहे.तसेच सांडपाणी व्यवस्थापण बाबत शोषखड्डे निवडतांना नालींची स्वच्छता करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक शौचालय हे ज्या ठिकाणी वापरात येईल ती जागा निवडण्याचे तसेच लाईट,पाणी,अपंगासाठी रॅम्प असणे आवश्यक आहे. इ.सुधारणात्मक सुचना दिल्या. ग्रामपंचायत पुलखल येथे नळयोजने विषयी असलेल्या विविध अडचणी जाणुन घेवुन प्रत्यक्ष नळ योजना स्त्रोत,पाईप लाईन,नळ जोडणी बाबत पायदळ चालत जावुन पाहणी केली.

पुलखल येथे इंटेक वेल घेणे,वॉल दुरुस्ती करणे इत्यादी सुधारणा बाबत सुचना दिल्या व गावकऱ्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा केली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एफ.आर.कुत्तीरकर, जिल्हा परिषद गडचिरोली,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अमित तुरकर,गट विकास अधिकारी,मुकेश माहोर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार,बि.आर.सी.अंमलबजावणी सहाय्य संस्था कर्मचारी, संबंधित ग्रामपंचायत सचिव,सरपंच,ग्रा.पं.सदस्य,महिला मंडळी नागरीक उपस्थित होते.

हे देखील वाचा,

युक्रेनमध्ये गडचिरोलीच्या दोन विद्यार्थिनी अडकल्या

नक्षलवाद्यांनी जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र, स्फोटकांचा मोठा साठा शोधून काढण्यात पोलीस जवानांना मोठे यश

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना जीप.पंस असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!

Clead news M Uddhav Thakareylead stori SP Ankit Goyal