लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर : १५ डिसेंबर २०२४ रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून त्यानंतरही खातेवाटप झाले आहे. परंतु आता पालकमंत्रीपदावरून सत्ताधारी नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारण्याचे सूचक वक्त्यव्य केल आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. विरोधकांनी सरकारला चहूबाजूने घेरत धारेवर धरलं आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांचा खास माणूस असलेल्या वाल्मिकी कराडचे नाव प्रमुख आरोपी म्हणून घेतले जात असून या घटनेला अनेक दिवस उलटून गेले तरीही आरोपींना अटक झाली नाही त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्त्या प्रकरणी बोलताना म्हणाले की, ‘ बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, राज्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यावर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी जावं. पण तिथे जाऊन राजकारण करू नये असं फडणवीस बोलताना म्हणाले. तसेच ‘ पालकमंत्री पदाबाबत राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि दोन उपमुख्यमंत्री ठरवतील. मला बीडला पाठवलं तर मी बीडला सुद्धा जाईल.
मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व घेत नसतात. परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेण्याची माझी इच्छा आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिंदे सरकारमध्ये धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. यावेळीही त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार की पंकजा मुंडे यांना मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्येच्या घटनेमुळे राज्यात धनंजय मुंडे यांना पुन्हा बीडचं पालकमंत्रीपद न देता मुख्यमंत्री फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यावं अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे बीडचे नवे पालकमंत्री कोण याची जोरदार चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा,
27-28 डिसेंबर दरम्यान राज्यात गारपीटआणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज