प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियान अंतर्गत मुख्यंमत्री महाआरोग्य कौशल्य अभियान कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि.15 जून : गडचिरोली जिल्हयामध्ये आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोविड-19 च्या पाश्र्वभूमीवर उद्भभवेलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे याकरीता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असलेल्या जिल्हयातील 18 ते 45 वयोगटातील युवक/युवतीला हेल्थ केअर, पॅरामेडीकल, नर्सिग व डोमेस्टीक वर्क्स या क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियान अंतर्गत मुख्यंमत्री महाआरोग्य कौशल्य अभियान कार्यक्रम राबविण्यात येत असून गडचिरोली जिल्हयातील एकूण 12 शासकीय/खाजगी/ ट्रस्ट रुग्णालय यांच्या माध्यमातुन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यांत येणार असून जिल्हयातील युवक/युवतींनी आपला सहभाग नोंदवावा.

अधिक माहिती करीता दुरध्वनी क्र. 07132-222368 यावर संर्पक साधावा असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :

माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलत करीता एकविध क्रीडा संघटनेमार्फत अहवाल सादर करणेबाबत

खेरवाडी सोशल वेल्फेअर मुंबई अंतर्गत ४ कुरमा घरांचे लोकार्पण सोहळा

वडसा- गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा ५० टक्के निधी उपलब्ध करून द्या

 

CM Uddhav Thackreraylead story