मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, दि. 28 मे :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विनम्र अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीश साम्राज्याला सातत्याने हादरे दिले. आपल्या अमोघ लेखणीने त्यांनी ब्रिटीश राजवटीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाभाडे काढले. राष्ट्र उभारणी, समाजसुधारणा यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. उत्तम संघटक, साहित्यिक -प्रतिभावंत अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्राला,जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

हे देखील वाचा :

मोठी बातमी: दहावीचा निकाल जूनच्या अखेरीस, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे होणार मूल्यमापन – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

पाकिस्तान मध्ये बनतोय विचित्र कायदा; १८ वर्षावरील तरुण तरुणीचे लग्न न झाल्यास पालकांना दंड

कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती

 

CM Uddhav Thakaraylead story