ग्रामसडक योजनेच्या कामावर गिट्टीमीश्रीत “चुरी”

खमनचेरू रस्त्याच्या दर्जोंनतीकरणातील प्रकार...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी दि ०६ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्ररामा ९ ते खमनचेरू अहेरी रस्ता एस आर ८४ इजीमा ६४ नुसार दर्जोंनतीचे काम कासवगतीने मागील दोन-तीन वर्षापासून सुरू आहे. सदर रस्त्यावर काही ठिकाणी डांबरीकरणाचा अभाव, पुनरकोट करताना सुद्धा डांबरीकरणाच्या अभावासह असलेल्या पुढील कामावर रस्त्याच्या बाजूला प्याचमध्ये गिटीएवजी चूरीमिश्रित गट्टीचा वापर होत असल्याने रस्त्याच्या दर्जोंनतिकरणावर नागरिकांनी प्रश्न निर्माण केला आहे.

सुरुवातीपासून कधी मुरूम नाही तर कधी वनविभागाची परवानगी नाही म्हणून वादग्रस्त ठरलेल्या व ४६१ लाख रुपयाचे काम असलेल्या अहेरी खमणचेरू रस्त्याचे संथ दर्जाणतीकरण खमनचेरू परिसरातील दहा-बारा गावांमधील नागरिकांना, वाहनधारकांना धोक्याची घंटी साबीत होत आहे.
याचा रस्त्याच्या कोडेलवार कॉम्प्लेक्स जवळ डांबरीकरणाचा अभाव, हॉकी ग्राउंड जवळ पुनरकोट टाकताना डांबरीकरणाची कमतरता नागरिकांना दिसून आली होती. ही बाब गावातील जवळपास दोन किलोमीटर पर्यंत रस्त्याच्या कामातील असल्याने पुढील पाच किलोमीटरच्या गावाबाहेर डांबरीकरणाची कामाची अवस्था कशी असेल ? याचे उत्तर विभागाचे अभियंते नागरिकांना देऊ शकतील का?

खमनचेरू रस्त्याच्या स्नेहा लान पासून एका बाजूला जेसीपीने ओबडधोबड खोदून कामातील रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत चुरीमिश्रित गिट्टी टाकण्यात आली आहे. तसेच काही ढीगांमध्ये गिट्टीचे मोठे दगड असल्याने रस्त्याच्या दर्जोंनतीकरणावर खमनचरु-अहेरी परिसरातील नागरिकांनी संशय निर्माण केला आहे.

दोन किलोमीटर रस्त्याच्या दर्जावर अधोगती असेल तर दोन्ही बाजूंना सात किलोमीटर शिशी कटर, दोन व तीन सीसी कलवर्टचे अनुक्रमे सात व दोन नग तर 14 फिल्ड ड्रोनच्या चालू रस्त्यावरील शिडी कामाची अवस्था कशी असणार ? अशी विचारणा लोक करीत आहेत.

सदर रस्त्याच्या कामावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होणाऱ्या बाबीकडे लोकप्रतिनिधी व संबंधित अभियंतांनी नागरिकांच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हे देखील वाचा,

स्फोटकांनी भरलेले 03 क्लेमोर पाईप्स, डिटोनेटरने भरलेले 06 प्रेशर कुकर, गडचिरोली पोलिसांनी केला नष्ट

 

ajit pawarCM eknath shindelead newsमुख्यमंत्री ग्राम सडक योजना ..
Comments (0)
Add Comment