केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 37 बटालियन तर्फे स्वच्छता रॅली काढण्यात आली.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी : ९ आणि ३७ बटालियन, सी.आर.पी.एफ द्वारे दिनांक १४/०९/२०२४ रोजी चालविण्यात येत असलेल्या अभियान ‘स्वच्छता ही सेवा’ दिनांक १४ सप्टेंबर ते ०२ आक्टोबर पर्यंत चे अहेरी बस स्टँड येथे ०९ बटालियनचे कमांडंट शंभू कुमार आणि ३७ बटालियनचे कार्यकारी कमांडंट सुजित कुमार यांच्या उपस्थितीत धर्मराव बाबा आत्राम, मंत्री अन्न व औषध प्रशासन यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून विधिवत शुभारंभ करण्यात आला.धर्मराव बाबा आत्राम, मंत्री महोदय आणि ०९ आणि ३७ बटालियनचे कमांडंट यांनी स्थानिक नागरिकांचे मनोबल वाढवले आणि त्यांच्या शब्दांनी त्यांना त्यांचे घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रोत्साहित केले.

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत दिनांक १४/०९/२०२४ रोजी स्वच्छतेची शपथ ग्रहण/स्वच्छता जनजागृती रॅली/स्वच्छतेशी संबंधित बॅनर/पोस्टर्सचे प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा मुख्य उद्देश स्वच्छतेची भावना जागृत करणे हा आहे. या रॅलीत स्थानिक नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

यावेळी ०९ बटालियनचे कमांडंट शंभू कुमार, ३७ बटालियनचे कार्यवाहक कमांडंट  सुजित कुमार (व्दितीय कमान अधिकारी), ०९ बटालियनचे अधिकारी डॉ. दीप शेखर मोहन (सी.एम.ओ.) कमांडंट,  योगेंद्र आनंदराव ढाकोळे (व्दितीय कमान अधिकारी), आणि बटालियनचे ३७ इतर अधिकारी द्वितीय कमान अधिकारी शिवकुमार राव, उप कमांडंट चंचल परवाना, ०९ बटालियन सहाय्यक कमांडंट  कमलेश इंदोरा तसेच ०९ व ३७ बटालियनचे सर्व अधिनस्त अधिकारी/जवान तसेच अहेरी बस डेपोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment