मल्लमपोडूर,कोरेगाव येथील सरपंचाशी साधला मुख्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात संवाद

प्रशासनाच्या मदतीने गावा गावात लसीकरण यशस्वी – मल्लेमपोडूर सरपंच यांनी मुख्यमंत्र्यांना दिली माहिती. दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेशी जिल्हयातील दोन सरपंचांनी साधला संवाद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 11 जून: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंचांच्या दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत गडचिरोलीमधील भामरागड तालुक्यातील दुर्गम मल्लेमपोडूर या ग्रामपंचायतीमधील सरपंच रोशन वड्डे यांचेशी संवाद साधला.

या बैठकीत कोरोनाला थोपविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काय काय उपक्रम केले याबाबतची माहिती राज्यातील विविध सरपंचांनी सादर केली. यावेळी सरपंच श्री वड्डे  यांनी त्यांनी आपल्या गावात केलेल्या विविध उपाय योजनांची माहिती सादर केली. सरपंच म्हणाले की गावात आम्ही कोरोना विरोधी पथक स्थापन करून संसर्ग रोखण्यासह लसीकरणासाठी कार्य केले. प्रशासनाने दिलेल्या सूचनांची यशस्वी अंमलबजावणी करून कोरोना संसर्ग रोखण्यात आम्हाला यश आले.

प्रशासनाने कोरोना विषयक विविध जनजागृती गावात केली. आम्हीही सोबत राहून लोकांना माहिती दिली व आज आमच्या गावात वय वर्षे 45 वरील 517 पैकी 383 व्यक्तींना लस दिली अजूनही लसीकरण सुरूच असल्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली. या दुरचित्र प्रणाली द्वारे झालेल्या बैठकीला सोबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पद्मश्री पोपटराव पवार देखील उपस्थित होते. गडचिरोली जिल्हयातून मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण, कोरेगाव वडसा येथील सरपंच प्रशांत किलनाके उपस्थित होते.

      या बैठकीत सरपंच यांनी केलेल्या विविध उपाययोजनांबंद्दल मुख्यमंत्री यांनी त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की लढाई अजून संपलेली नाही. अजूनही आपणाला तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. गावागावात शारिरिक अंतर पाळून येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थांबवायचे आहे. या बैठकीत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर समाज माध्यमांचा वापर करून लोकांना माहिती द्या असा संदेश दिला. तसेच वाडी वस्तीवर पथके तयार करून संसर्ग थोपविण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचनाही यावेळी दिल्या.

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्युसह 69 कोरोनामुक्त, तर 16 नवीन कोरोना बाधित

सोमवारपासून पुणेकरांना आणखी दिलासा, नियम शिथिल होणार

 

CEO Kumar AshirwadCM Uddhav Thakaraylead story