सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा १४-१५ ऑगस्टला गडचिरोली दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, १३: 

राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे १४ व १५ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. विविध विकास उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वातंत्र्यदिन सोहळ्यांमध्ये ते सहभागी होणार असून त्यांचा दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१४ ऑगस्ट २०२५, गुरुवार —

दुपारी २.०० वाजता सोनापुर येथील शासकीय फळ रोपवाटीका, कृषी चिकित्सालयात आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव २०२५ चे उद्घाटन समारंभ; दुपारी २.३० वाजता नगरपरिषद, गडचिरोली येथे इंटरएक्टिव्ह पॅनल लोकार्पण सोहळा; दुपारी ३.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीची सभा; सायं. ६.०० वाजता जिल्हा नियोजन भवन येथे पत्रकार परिषद; सायं. ६.३० वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन व मुक्काम.

१५ ऑगस्ट २०२५, शुक्रवार — सकाळी ९.०० वाजता शासकीय विश्रामगृहातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण; सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती; सकाळी १०.०० वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन व थोडा विश्रांती; त्यानंतर सोयीनुसार रामटेककडे प्रयाण.

सहपालकमंत्र्यांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील विकास, नियोजन आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार असून स्वातंत्र्यदिन सोहळ्याला त्यांची उपस्थिती विशेष औचित्य आणणार आहे.

Ashish Jaiswal