राज्यात थंडीची लाट; थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई :७ डिसेंबर

मागील काही दिवसांपासून सुरु झालेला हिवाळ्याचा ऋतू आता खऱ्या अर्थानं राज्यात आणि देशात स्थिरावू लागल्याचं चित्र आहे. उत्तर भारतात सातत्यानं तापमानाचा पारा खाली जात असून, दिल्लीपासून अगदी जम्मू काश्मीरपर्यंत याचे थेट परिणाम पाहायला मिळत आहेत. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीत तापमानाचा आकडा 12 अंशांखाली उतरल्याचं निरिक्षात आढळून आलं. उत्तरेकडील कोरड्या आणि थंड वाऱ्यांमुळं जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमधील काही उंच प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे. 

दरम्यान, देशाच्या उत्तरेकडे आलेली ही थंडीची लाट राज्यावरही परिणाम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पुणे,नाशिक, सातारा,   नागपूर, कोल्हापूर या भागांसह मुंबईतही तापमानाचा आकडा खाली गेल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात 11.5 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. तर, महाबळेश्वरमध्ये 14.3 अंश सेल्शिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं.

weatherchangewinter