गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या पूर आल्याने थेट पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्डवर…

जिल्हाधिकारी यांनी नागरिकांशी साधला संवाद .., प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 20 जुलै –रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. यामुळे १४ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर, भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला असून १०० गावाचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी संजय दैने थेट भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्डवर स्वतः बाहेर पडून प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना त्वरीत राबवून नागरिकांशी संवाद, दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त करीत केले.

जिल्हाधिकारी दैने यांनी चांदाळा कुंभी, तसेच आरमोरी, वडसा, कुरखेडा तालुक्यात भेट देत नागरिक व शाळकरी मुलांशी संवाद साधून नागरिकांनी काळजी घ्यावी, पूलावर पाणी वाहत असतांना घाईगडबडीत पूल ओलांडू नये, विजा चमकत असतांना झाडाखाली उभे राहू नये, मानवी चुकांमुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी होवू नये याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करीत तसेच प्रशासकीय यंत्रणेला परिस्थितीवर बारीक नजर ठेवून अलर्ट राहण्याचे व नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना नियमितपणे राबविण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी संजय दैने यांचेसमवेत उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे, संबंधीत तहसिलदार, पोलिस अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक आपदा मित्र व नागरिक मदत कार्यासाठी उपस्थित होते.

gadchiroli floodgosekhurd waterSDRF gadchiroli