बंगाली समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द – खासदार नेते

विकासपल्ली येथील कालीमाता पुजन का होते उपस्थित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 26, ऑक्टोबर :-  अनेक वर्षांपासून येथे राहत असलेल्या बंगाली समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ही समस्या सोडवण्यासोबतच बंगाली समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले. विकासपल्ली येथे काली माता पुजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार नेते यांनी कालीमाता चे दर्शन घेउन स्थानिक नागरिकांसोबत थेट संवाद साधत नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

यावेळी एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, भाजपा युवा प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, नगरसेवक आशिष पिपरे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रामुख्याने येथील माजी शिक्षक भाजप नेते बिरेन विस्वास यांनी अनेक समस्या बंगाली समाजाच्या वतीने खासदार अशोक  नेते यांचे समोर सविस्तर मांडले. यासाठी खा.अशोक नेते  सकारात्मक विचार व्यक्त करत विकासपल्लीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असे व्यक्तव्य याप्रसंगी केले.

हे देखील वाचा :-

 

Committeddevelopmentof Bengalisocietyto all-round