गावाच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द – कंकडालवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भामरागड,  19,ऑक्टोबर :-  नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढू व या भागातील प्रत्येक गावाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. ते भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम मन्नेराजाराम गेरा येथील जनतेशी संवाद साधत होते.

यावेळी मन्नेराजाराम गेरा परिसरातील जनतेनी आपल्या समस्या सिंचन, रोजगार, रस्ते, शिक्षा, बॅंक, पाणी अशा अनेक ज्वलंत समस्या त्यांच्या समोर ठेवल्या. यावेळी मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलादी, भामरागड नगर पंचायतचे उपाध्यक्ष विष्णू मडावी, लालसू आ़त्राम, नरेंद्र गरगम, श्रीकांत बंडमवार, दसरत चांदेकर, रमेश झाडे, शामराव झाडे, दिनेश जुमडे, गणेश नागपुरवार, प्रभाकर मडावी, चिन्नू सडमेक, मनोज सिडाम, सुरज तलांडे, नंदा सडमेक, विक्की झाडे, राजू निलम सह गावातील नागरिक मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

विद्यार्थी सहकाराच्या भावनेतून ध्येय गाठावे – उमाजी गोवर्धन

चक्रीवादळ ऐन दिवाळीत फटका फोडणार ! हवामान खात्याचा अंदाज.

ajaybhamragadbhetkankadalwar