गोविंदपूर नाल्यावरील पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करा – खा. अशोक नेते

  • खा. अशोक नेते यांचे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व कंत्राटदाराला सूचना.
  • गोविंदपूर नाल्यावरील पूल बांधकामाची केली पाहणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ११ जून: गडचिरोली- चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील गोविंदपूर गावाच्या अलीकडील व गावाच्या पलीकडील दोन्ही नाल्यावरील पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करून पावसाळ्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी व काही अडचण निर्माण झाल्यास आपली यंत्रणा २४ तास सुसज्ज ठेवून वेळीच रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या उप कार्यकारी अभियंता आवळे व कंत्राटदाराचे व्यवस्थापक किशोर गायकवाड यांना दिले.

आज दि. ११ जून रोजी सायंकाळी खा. अशोक नेते यांनी गोविंदपूर लगतच्या नाल्यावरील पूल बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, भाजपचे गडचिरोली तालुका संपर्क प्रमुख विलास पाटील भांडेकर, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे, उपकार्यकारी अभियंता आवळे, व्यवस्थापक किशोर गायकवाड, स्वीयसहाय्यक रवींद्र भांडेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक नेते यांनी पुलाच्या बांधकाम दरम्यानच्या वळण मार्गावर मेटल लावून  रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे व रस्त्याच्या बाजूला लोखंडी कठडे लावण्यात यावे, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेसे वेस्ट जोडण्यात यावे, पावसाळ्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात यावी तसेच पुलाचे काम दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करण्यात यावे अशा सूचना यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिल्या. तसेच नागरिक व शेतकऱ्यांच्या काही अडचणी आल्यास ताबडतोब सोडविण्यात याव्या असे निर्देशही दिले.

हे देखील वाचा :

मल्लमपोडूर,कोरेगाव येथील सरपंचाशी साधला मुख्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात संवाद

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्युसह 69 कोरोनामुक्त, तर 16 नवीन कोरोना बाधित

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

 

ashok netelead story