… या जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद; अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रतिष्ठानेही सुरु, अजूनही नागरिक रस्त्यावर

  • विनाकारण करणाऱ्यांवर कारवाई करणार – जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अकोला, दि. १५ एप्रिल:  संपूर्ण राज्‍यामध्‍ये कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊनबाबत आदेश निर्गमित करण्‍यात आले असून संपूर्ण अकोला जिल्‍हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता  प्रतिबंधात्‍मक आदेश आहेत. या लॉकडाऊनला अकोला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत असून अकोला जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसोबतच काही प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांनी सुरू ठेवली आहेत नागरिक सुद्धा रस्त्यांवर दिसत असून पोलीस विभाग चोख बंदोबस्त ठेवून असून जी दुकाने उघडी आहेत अशांवर कारवाई करण्यात येत आहे.

राज्यात १४ एप्रिलला रात्री ८ वाजता नंतर संचारबंदी आदेश जारी झालेले आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद असणे आवश्यक आहे. या संचारबंदीमध्ये नियमांचे उल्लंघन होवू नये म्हणून, प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात येणार असून पोलिसांचे एक पथक हे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आज दिली.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यात परत कडक संचारबंदीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन होवू नये म्हणून कडक निर्बन्ध त्यांनी लावले आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद असावीत. तसेच १४४ कलम लागू करण्यात आली आहे. यामुळे विनाकारण जमाव किंवा सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पाच पेक्षा जास्त नागरिकांचा जमाव असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले.

तसेच प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाजारपेठ आणि विना जीवनावश्यक वस्तू दुकाने उघडणाऱ्या कारवाई साठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक कारवाई करणार आहे. तसेच सकाळ आणि सायंकाळी प्रत्येक चौकात नाकाबंदी करण्यात येणार आहे. यावेळी विनाकारण फिणाऱ्यांवरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली आहे.

break the chain