टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

जपानची राजधानी टोकीयो शहरात आजपासून सुरु होत असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी जगभरातील सर्व खेळाडूंचं मन:पूर्वक अभिनंदन. स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी, स्पर्धेच्या यशस्वितेसाठी हार्दिक शुभेच्छा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २३ जुलै : टोकियो ऑलिंपिकमध्ये 126 खेळाडूंचा भारतीय संघ अठरा क्रीडाप्रकारात देशाला पदक जिंकून देण्यासाठी खेळणार आहे. आपल्या महाराष्ट्रातून 1) राही सरनोबत, कोल्हापूर (खेळ-शुटींग-25 मीटर पिस्तूल), 2) तेजस्वीनी सावंत, कोल्हापूर (खेळ-शुटींग-50 मीटर). 3) अविनाश साबळ, बीड (खेळ-अॅथलेटिक्स 3000 मीटर स्टिपलचेस). 4) प्रविण जाधव, सातारा (खेळ-आर्चरी), 5) चिराग शेट्टी, मुंबई (खेळ-बॅडमिंटन पुरुष दुहेरी), 6) विष्णू सरवानन, मुंबई (खेळ-सेलिंग), 7) स्वरुप उन्हाळकर, कोल्हापूर (खेळ-पॅरा शुटिंग-10 मीटर रायफल), 8) सुयश जाधव, सोलापूर, (खेळ-पॅरा स्विमर-50 मीटर बटर फ्लाय, 200 मीटर वैयक्तिक मिडले) हे आठ खेळाडू देशाला ऑलिंपिक पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतील.

आपल्या उत्तम कामगिरीनं, खिलाडूवृत्तींनं राज्याचा, देशाचा गौरव वाढवतील, असा विश्वास आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या टोकीयो ऑलिंपिकमध्ये सहभागी खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो.

ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होत भारतीय संघातील खेळाडूंना, क्रीडा कार्यकर्त्यांना, क्रीडा रसिकांना टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या मन:पूर्वक शुभेच्छा…

हे देखील वाचा :

ऑपरेशन वर्षा 21: महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी  वैद्यकीय पथकासह लष्कराची तुकडी तैनात 

अवैध दारु वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई, देशी, विदेशी दारुसह दोन डस्टर कार असा एकुण 16 लाख 50 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

मोठी बातमी : अतिवृष्टीमुळे 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळले; 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

ajit pawarlead story