लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत गडचिरोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवणी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुकाध्यक्ष वसंत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यकर्त्या रजनीताई राऊत यांच्या पुढाकाराने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
मुडझा, येवली, पोटेगाव परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांची व महिलांसाठी विशेष तपासणी अशा विविध आरोग्यसेवा तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत देण्यात आल्या.
डॉ. मयूर दुधे, डॉ. केतन कुमरे, डॉ. प्रतिभा वट्टी (कुमरे) यांच्यासह अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांची तपासणी केली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळाली असून स्थानिकांनी काँग्रेस कमिटीच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले.