वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालयात संविधान दिवस साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 26 नोव्हेंबर :- आज दिनांक २६ नोव्हेंबर, २०२२ रोजी वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालयात
संविधान दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. किशोर एस. मानकर, वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून विलास बावस्कर, उप वन अभियंता हे होते. तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी वृंद कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर एस. मानकर, वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करुन संविधान दिवस साजरा करण्यात आला.

संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी बावस्कर सर, उप वन अभियंता यांनी संविधान दिनांबद्दल माहिती दिली. तसेच कार्यक्रमास उपस्थित कर्मचारी यांचेतील थेरकर यांनी देखील संविधान दिनाबद्दल मोलाची माहिती सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर मानकर सर यांनी संविधान उद्देशिकाचे सार विस्तृतरीत्या समजावून सांगून, नागरीकांचे मुलभूत अधिकार व कर्तव्याचे पालन प्रत्येक नागरिकांनी केले पाहिजे असे आवाहन केले आणि संविधान दिनाच्या सर्वांना सुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन आशिष प्रभाकर घोनमोडे, लिपीक यांनी केले असून आभार प्रदर्शन संदिप दिगांबर कांबळे, लिपीक यांनी मानले. सदर कार्यक्रमास कडते, सोलटे, सर्वश्री येडलावार, कुमरे, साळवे, ढवळे, लांजेवार, मेश्राम, आलाम, लाडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सुधाकर येडालावर, लेखापाल यांनी नियोजन केले.

हे देखील वाचा :-

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

Conservator of Forests gadchiroliconstitution dayGadchiroliindian constitution