स्थानिक बाजारपेठ किंवा तालुक्याचे उत्पादन लक्षात घेऊन धान खरेदीचे लक्ष ठरवावे.

कृ.उ.बा. समिती सिरोंचाचे उपसभापती सतीश गंजीवार यांची मुख्यमंत्र्याकडे निवेदना द्वारे मागणी.  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिरोंचा, दि. ८ डिसेंबर: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक प्रादेशिक कार्यालय गडचिरोली मार्फत जिल्ह्यात खरीप हंगामाचे धान खरेदी करण्याकरिता खरेदी केंद्रे उभारण्यात आले आहे. आदिवासी विविध सहकारी संस्था मार्फत धान खरेदी करण्यात येते जिल्हा कृषी अधीक्षक आणि आदिवासी विकास महामंडळ यांचे द्वारा भात पेरणीचे क्षेत्र लक्षात घेऊन उत्पन्नाचे सरासरी आणि त्यानुसार प्रत्येक हेक्टरसाठी किमान खरेदी किती असावयास पाहिजे हे निर्दिष्ट करण्यात येते.

चालू वर्षात आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोली यांनी दिनांक ११/११/२०२० रोजीचे त्यांचे पत्रानुसार ह्या जिल्ह्यातील हेक्टरी उत्पन्न २६.६६ क्विंटल इतके ठरविले व या पैकी ९०% उत्पन्न म्हणजे २४  क्विंटल धान खरेदी करता यावा असे ठरवून खरेदी केंद्रांना कळविले आहे.

प्रत्येक हेक्टरी २६.६६ क्विंटल च्या हिशोबाने हेक्टरी उत्पादन ९.६६ क्विंटल सरासरी येत म्हणजे या क्षेत्रात प्रत्येक हेक्टरी धानाचे उत्पादन ९ क्विंटल उत्पादन होतो असे हिशोब काढण्यात आले. सदरचे हिशोब चुकीचे व शेतकऱ्यांना त्यांचे   शेतमालाला बाजारपेठ न मिळविले आणि त्यांना निराश करण्याचे योजना आहे कारण प्रती हेक्टरी धान उत्पादनाचे खर्च किमान रुपये ९० हजार ते १ लाख येते. शिवाय वाहतूक खर्च बाजारपेठ सेस हिशेब धरुन या क्षेत्रात किमान उत्पादन ६० ते ६५ क्विंटल होणे अपेक्षीत आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास पिक उत्पन्न कमी झाल्यास किमान ५० क्विंटल उत्पन्न ठरलेली आहे. त्यामुळे हेक्टरी हिशोबानी खरेदी करावयास झाल्यास २० ते २५ क्विंटल धानाचे खरेदी शासनाने करावी तसेच मागील वर्षी देखील दर हेक्टरी १६ क्विंटल या दराने खरेदी करण्यात आले उत्पादन जास्त असल्याने त्यानुसार उत्पादन खर्च ही जास्त असल्याने शेतकऱ्याला खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धान वजा करता उरलेले धान खाजगी व्यापारांना कमी भावात विक्री करावा लागते . त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य मोबदला मिळत नाही परिणामी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही व खाजगी व्यापाऱ्यांचा हाती शेतकरी नागविल्या जातो या योजनेचा शेतकऱ्यांना काहीच नफा झालेले नाही आणि स्थानिक बाजारपेठ किंवा तालुक्याचे उत्पन्न लक्षात घेऊन धान खरेदीचे लक्ष ठरवावा म्हणजेच किमान २० ते २५ क्विंटल धान खरेदी केंद्रावर दर हेक्टरी खरेदी करण्यात यावा. धान खरेदी हंगाम सुरु झालेली आहे धान खरेदी केंद्रे धान खरेदी करण्यास सज्ज झालेले आहेत शेतकऱ्यांचे शेतमाल शेतात आहे.

अशा स्थितीत या संबंधी शासन महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ संबंधित कृषी खात्याचे अधिकारी यांनी एकत्र बसून विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला असून याबाबत शासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.  अशा आशयाचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचाचे उपसभापती सतीश गंजीवार यांनी मुख्यमंत्री यांना पाठविले आहे.